नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही #MeToo वादळावर आज आपलं मौन सोडलं आहे. महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी #MeToo चळवळीला समर्थन दिलं आहे. बदल आणण्यासाठी सत्य निडर होऊन बोलणं गरजेचं आहे. असं देखील त्यांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सध्या #MeToo चळवळ जोर पकडत आहे. या चळवळीत रोज नवीन नवीन नावे समोर येत आहे. अनेक मोठ्या व्यक्तींवर आरोप होत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर महिलांकडून आरोप होत आहेत. बॉलिवुड, राजकारण, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींवर आरोप झाले आहेत. या चळवळीला अनेकांचा पाठिंबा देखील मिळत आहे.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलं की, 'महिलांशी सन्मानाने आणि आदराने कसं वागावं हे शिकण्याचा हा काळ आहे. मला आनंद आहे की, महिला समोर येत आहेत.'


6 महिला पत्रकारांनी परराष्ट्र राज्य मंत्री एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता राहुल गांधी यांनी ट्विट केल्यानंतर काँग्रेस या मुद्द्यावर आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र राज्य मंत्री सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. भारतात आल्यावर सरकार त्यांचा राजीनामा घेऊ शकते.