मुंबई : राहुल गांधी यांची कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड झाली.  दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. 150 हून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या पक्षाचे अध्यक्षपद, तेही सलगपणे सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या निवृत्तीकडे सर्वसामान्यपणे पाहून चालणार नाही. ही निवृत्ती एका मोठ्या काळाचीही साक्षीदार आहे. या निवृत्तीला मोठे महत्त्व आणि अनेक पदरही आहेत. म्हणूनच सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्विकारल्याचा काळ आणि तत्कालीन स्थिती. तसेच, आतापर्यंत घडलेल्या घडामोडी, झालेले बदल यावर टाकलेला हा अल्प कटाक्ष.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-सोनिया गांधींनी 1998 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली..


- त्यावेळी देश आर्थिक संक्रमणातून जात होता. भारताचा जीडीपी सुमारे 415.7 अरब डॉलरच्या आसपास होता. जो सध्या 23 खरब डॉलरच्या जवळपास पोहोचला आहे.


- निवडणुकीच्या राजकारणात आघाडी सरकार सत्तेवर आले. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपने 254 जागा जिंकल्या होत्या. अटलबिहारी बाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते.
- विशेष असे की, भाजपने 1998 ते आतापर्यंत तब्बल 11 वेळा अध्यक्ष बदलले आहेत.


- दरम्यान, भारताने पोखरणमध्ये अणूचाचण्या केल्या होत्या. जगात आम्हीही अण्वस्त्रसक्षम आहोत हा संदेश गेला होता.


-भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होती स्थिती?


- भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही 28 मे 1998ला अण्वस्त्र चाचणी केली.


-मनोरंजन क्षेत्रात टायटॅनिक चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासह 11 मानांकनं मिळाली.


फ्रांन्सने 16वा फिफा वर्ल्डकप जिंकला होता. या विश्वचषकात रोडाल्डो सर्वात उत्कृष्ठ खेळाडू ठऱला होता.


- NYSE मध्ये 261 अरब डॉलरच्या किंमतीने मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी बनली.
-आज अनेकांच्या जीवनावर अधिराज्य गाजवत असलेल्या इंटरनेट क्षेत्रातील आणि जगातील सर्वात सर्वात मोठे सर्च इंजिन ठरलेल्या गूगलची स्थापना झाली होती.