नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस आणि आपल्या वाचळपणा बद्दल प्रसिद्ध असणारे दिग्विजय सिंह यांचे पक्षातील अधिकारांचे पंख छाटण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा, कर्नाटक नंतर तेलंगणाचं प्रभारीपदही दिग्विजय सिंहांकडून काढून घेण्यात आलंय. आता दिग्विजय सिंहांकडे केवळ आंध्रप्रदेशचे प्रभारीपद उरलय. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही दिग्विजय सिंहांनी तातडीनं हालचाली न केल्यानं सत्ता भाजपच्या पदरात पडली. 


केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरींनी यामुद्द्यावरून दिग्विजय सिहांवर टीकेची मोठी झोड उठवली होती.  गोव्यात झालेल्या नाचक्कीनंतर २९ एप्रिलला दिग्विजय सिंहाकडून गोवा आणि कर्नाटकचं प्रभारीपद काढून घेण्यात आलं होतं. मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आदेशानुसार तेलंगणाचाही भार त्यांच्या खांद्यावरून दूर करत असल्याचं प्रसिद्धीपत्रक पक्षानं जारी केलंय.