नवी दिल्ली: देशाचा ७० वा प्रजासत्ताक दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. तर देशातील नागरिकांनीही सोशल मीडिया व अन्य माध्यमातून एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या सगळ्यात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काँग्रेसच्या या गांधीगिरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला होता- शशी थरुर


काँग्रेसकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण इतक्यावरच संपत नाही. कारण, काँग्रेसने अॅमेझॉन या ई-कॉर्मस संकेतस्थळावरून संविधानाची प्रत खरेदी खरून नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. मात्र, काँग्रेसने ही प्रत खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे हे पार्सल केंद्रीय सचिवालयात पोहोचल्यानंतर त्यांनाच याचे पैसे चुकते करावे लागतील. तर दुसरीकडे प्रत स्वीकारली नाही तर भाजपची एकप्रकारे कोंडी केली जाऊ शकते.



काँग्रेसने या पार्सलची पावती (Reciept) ट्विटरवर शेअर केली आहे. यासोबत खोचक संदेशही लिहण्यात आला आहे. संविधानाची प्रत लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जेव्हा देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला सवड मिळेल तेव्हा कृपया संविधान वाचा, असे काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे.