`साडेतीन वर्ष जमलं नाही ते आता काय करणार?`
पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांचं प्रमोशन झालं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वेला रामराम केला आहे. पीयूष गोयल यांच्याकडे आता रेल्वेचा भार देण्यात आला आहे.
दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारावर काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी टीका केली आहे. साडेतीन वर्षात काही करु शकले नाही ते आता नवे चेहरे काय करतील, असा बोचरा सवाल आझाद यांनी विचारला आहे.
कोणाला मिळालं कोणतं खातं
कॅबिनेट मंत्री
1. धर्मेंद्र प्रमुख- कौशल्य विकास आणि पेट्रोलियम मंत्रालय
2. पीयुष गोयल- रेल्वे मंत्रालय
3. नर्मला सीतारमन- रक्षा मंत्रालय
4. मुख्तार अब्बास नकवी- अल्पसंख्यांक मंत्रालय
5. सुरेश प्रभू- वाणिज्य मंत्रालय
6. स्मृती इराणी- माहिती आणि प्रसारण मंत्रालय
7. नितीन गडकरी- जल संसाधन मंत्री
8. उमा भारती- पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय
राज्यमंत्री
1. शिव प्रताप शुकला - अर्थ राज्यमंत्री
2. अश्विनी कुमार चौबे- आरोग्य व कुटुंब कल्याण
3. वीरेंद्र कुमार- महिला व बाल विकास
4. अनंत कुमार हेगडे- कौशल्य विकास राज्य
5. राजकुमार सिंह- ऊर्जा आणि नूतनीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)
6. हरदीप सिंह पुरी- गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)
7. गजेंद्र सिंह शेखावत- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
8. सत्यपाल सिंह- मानव संसाधन मंत्रालय
9. अल्फोंस कन्नननाथम - पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)