नागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) देशभरात विरोध होत असताना, दिल्लीत सोनिया गांधी, Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) धरणं आंदोलन करणार आहेत.
नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) देशभरात विरोध होत असताना, दिल्लीतल्या राजघाट इथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) धरणं आंदोलन करणार आहेत. उद्या दुपारी ते राजघाट इथे महात्मा गांधीच्या समाधीस्थळी आंदोलन करणार आहेत.
दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत हे आंदोलन केलं जाणार आहे. नागरिकत्व कायद्याबाबत राजघाटवर जाऊन निषेध व्यक्त करणार असून, हिंसेचं उत्तर अहिंसेच्या माध्यमातून देण्यासाठी राजघाटवर जाणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले आहे. या आंदोलनाद्वारे राहुल गांधी प्रथमच नागरिकत्व कायद्यावर मैदानात उतरणार आहेत.
राजस्थानमध्ये मोर्चा
राजस्थान काँग्रेस आज रविवारी राजधानी जयपूरमध्ये शांतता पदयात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री स्वत: अशोक गहलोत हे नेतृत्व करतील. अतिरिक्त पोलीस आयुक्त अजयपाल सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, जयपूर शहरात मुस्लिम समुदायाद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या शांतता मोर्चात अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी असतील.
सकाळी दहा वाजेपर्यंत हे सर्व लोक एमडी रोडवर एकत्र येऊन अल्बर्ट हॉलमध्ये पोहोचतील. येथून हा जलसा शांती मोर्चाचे रूप घेऊन दुपारी एक वाजेपर्यंत गांधी सर्कलवर पोहोचेल, जिथे बैठक आयोजित केली जाईल. खुद्द मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे शांतता मोर्चाचे नेतृत्व करतील.
मोहम्मद खान यांचे समर्थन
दरम्यान, नागरिकत्व कायद्याला काँग्रेस देशभरात विरोध करत असताना राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्री असलेले मोहम्मद खान यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या कायद्याचं समर्थन केले आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू आणि काँग्रेसचे वचन पूर्ण केले आहे.