छोटा उदयपूर : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधींनी गुजरातमधला पारंपारिक टिमली डान्स केला. मंगळवारी राहुल गांधी गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राहुल गांधींचं पारंपारिक अंदाजामध्ये स्वागत करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथल्या स्थानिक कलाकारांनी राहुल गांधींसमोर पारंपारिक टिमली नृत्य केलं. हे पाहून राहुल गांधींना राहावलं नाही आणि त्यांनीही कलाकारांसोबत नृत्य करायला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींबरोबर राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री अशोक गहलोतही होते. राहुल गांधींबरोबर अशोक गहलोत यांनीही टिमली डान्स केला.



 


त्याआधी वडोदऱ्यामध्ये असताना राहुल गांधींनी संघाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. संघामध्ये किती महिला आहेत? शाखेमध्ये कुठल्या महिलेला शॉर्ट्सवर बघितलं आहे का? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. 


राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्यावरील आरोपांवरून राहुल य़ांनी मोदींना चौकीदार संबोधून पुन्हा लक्ष्य केलं. तसंच बेटी बचाओ, बेटी पढाओ या सरकारच्या अभियानावरूनही राहुल यांनी अमित शाहांची खिल्ली उडवत के बेटे को बचाओ असा टोला हाणला.