नवी दिल्ली : तुमच्या शहरात जरी टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली असली तरी लखनऊमध्ये चित्र वेगळं आहे. लखनऊच्या उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर टोमॅटो दहा रुपये किलोने विकले जातायत. खरतर अशा प्रकारेच टोमॅटोची विक्री करुन वाढलेल्या दराबाबत निषेध व्यक्त केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी टोमॅटोच्या वाढलेल्या दराविरोधात निषेध व्यक्त करताना विधानसभेबाहेर टोमॅटोचे स्टॉल लावले. या स्टॉलवर कार्यकर्ते दहा रुपये किलोंना टोमॅटो विकले जातायत. तसेच या स्टॉलवर पोस्टरही लिहिले आहे यात टोमॅटोला आलेत अच्छे दिन असं म्हटलंय.


याआधीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी लखनऊमध्ये टोमॅटोच्या किंमतीवरुन सरकारविरोधात नाराजी व्यक्त करताना स्टेट बँक ऑफ टोमॅटो सुरु केले होते. या बँकेत अर्धा किलो टोमॅटो जमा केल्यास सहा महिन्यानंतर १ किलो टोमॅटो मिळणार. तसेच टोमॅटोसाठी लॉकरची व्यवस्था, टोमॅटोवर कर्ज देण्याची सुविधाही दिली जात होती.