...अन् Sukesh Chandrashekhar जेलमध्येच लहान मुलांसारखा रडू लागला, नेमकं असं काय घडलं?
Sukesh Chandrashekhar CCTV: मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrashekhar) एक नवं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत सुकेश चंद्रशेखर रडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान सीसीटीव्ही बाहेर आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Sukesh Chandrashekhar CCTV: दिल्लीच्या (Delhi) मंडोली जेलमध्ये (Mandoli Prison) 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिक्षा भोगत असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) ऐशोआरामात जगत आहे. जेलमधील एक सीसीटीव्ही (CCTV Video) लीक झाल्यानंतर याचा खुलासा झाला आहे. अधिकाऱ्यांनी जेलमध्ये छापा टाकल्यानंतर सुकेश चंद्रशेखरकडून दीड लाखांची चप्पल आणि 80 हजारांची जीन्स जप्त केली. पोलिसांनी आपल्या वस्तू नेल्यानंतर सुकेश चंद्रशेखर रडू लागला असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान जेलमधील सीसीटीव्ही लीक झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं जेल प्रशासनाने सांगितलं आहे.
सीसीटीव्हीत पोलीस कर्मचारी सुकेशच्या सामानाची तपासणी करत असल्याचं दिसत आहे. यावेळी सुकेश चंद्रशेखर एका बाजूला उभा राहून शांतपणे सर्व पाहत होता. या टीममध्ये तिहार जेलर दीपक शर्मा, उपअधीक्षक जयसिंग आणि केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने सुकेशची दीड लाखांची Gucci स्लिपर आणि 80 हजाराच्या दोन जीन्स जप्त केल्या आहेत. पोलीस कारवाई करुन जेलमधून गेल्यानंतर सुकेश चंद्रशेखर रडताना दिसत आहे.
कैद्यांकडे शस्त्रे, मोबाइल फोन किंवा अंमली पदार्थ अशा कोणत्याही प्रतिबंधक वस्तू नाहीत याची खात्री करण्यासाठी तुरुंग अधिकारी नियमितपणे अचानक तपासणी करत असतात.
सुकेशला आधी तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्याला दिल्लीबाहेरील जेलमध्ये ठेवलं जावं अशी त्याची मागणी होती. यानंतर सुकेश आणि त्याच्या पत्नीला ऑगस्ट 2022 मध्ये मंडोली जेलमध्ये हलवण्यात आलं होतं.
मनी लाँड्रिंग आणि अनेकांकडून खंडणी वसुली केल्याप्रकरणी सुकेशला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिहार जेलमध्ये असताना सुकेशने अनेक मोठे अधिकारी खंडणीचं रॅकेट चालवत असून आपल्याकडून करोडोंची लाच स्वीकारत असल्याचा आरोप केला होता. त्या मोबदल्यात, अधिकाऱ्यांनी कारागृहाबाहेरील त्याच्या साथीदारांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल फोन आणि इतर सुविधा दिल्या. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गेल्या वर्षी जुलैमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिहार तुरुंगातील 81 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर ही माहिती दिली होती.