Pramod Sawant : गोव्याचे राजकारण पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांमुळे तापले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याविरोधात सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टनंतर विरोधकांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांचे पथक थेट हरियात जाऊन चौकशी करणार आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा सरकारवर कर्जाचा बोजा आहे. अशातच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत जनतेच्या पैशातून अनावश्यक काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सोशल मिडियावर  एका पोस्टच्या माध्यमातून गोवा सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. 


हे सर्व आरोप गोवा सरकार आणि मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी फेटाळले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सावंत यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या जनतेने कर स्वरुपात भरलेल्या पैशांचा गैरवापर केला जात आहे. राज्य आधीच आर्थिक संकटात सापडले आहे अशा प्रकारे जनतेची लुट केली जात आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. 


आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.  गोवा सरकारवर 31000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. जनहिताची अनेक कामे प्रलंबित आहेत.  अशातच सरकार अनावश्यक कामांवर पैशांची उधळपट्टी करत आहे. सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हायरल पोस्टची चौकशी केली जात आहे. या पोस्ट हरयाणातून करण्यात आल्या आहेत. गोवा पोलिस हरयाणात चौकशी करणार आहेत.