भाजपच्या महिला नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, थुंकले तरी राज्यातील सरकार...
भाजपच्या महिला नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : भाजपच्या महिला नेत्या सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना या महिला नेत्यानं हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. भाजप कार्यकर्ते थुंकले तरी, छत्तीसगडचे सरकार वाहून जाईल. इतके भाजप कार्यकर्ते राज्यात आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय महासचिव डी. पुरंदेश्वरी यांनी म्हटलं आहे.
पुरंदेश्वरी यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांनीही प्रतिक्रिया दिली. जर कुणी आकाशाकडे बघून थुंकले तर, स्वतःच्याच तोंडावर पडतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
डी पुरंदेश्वरी यांनी म्हटलं की, 'BJP असा पक्ष आहे जो आपल्या कार्यकर्त्यांना कधीच विसरत नाही. येणाऱ्या निवडणुकीत छत्तीसडमध्ये संपूर्ण बहुमताचं भाजप सरकार आणायचं आहे.'
पुरंदेश्वरी यांनी आदल्या दिवशी आपल्या संबोधनात पुढे म्हटले होते की, 'भाजप विविध तत्त्वांचा पक्ष आहे, ज्याचे कार्यकर्ते नि: स्वार्थ आणि समर्पित भावनेने गरीब, निराधार आणि असहाय्यांची सेवा करतात. माजी केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर केला जातो, मग तो छोट्या शहराचा असो किंवा गावाचा. जर तुम्ही विचारले की पुढील काँग्रेस अध्यक्ष कोण बनेल, तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. पण भाजपमध्ये असे नाही, जेथे कोणताही कार्यकर्ता जो योग्य असेल तो पक्षाध्यक्ष होऊ शकतो.'