How ot Make Cake Without Oven : डिसेंबर  महिना म्हणजे सर्वाना हवाहवासा महिना, सगळीकडे ख्रिसमचे वारे वाहू लागतात , बच्चे कंपनीला तर नाताल बाबा सांताक्लॉस  चॉकलेट, केक  आणि मिळणारे गिफ्ट्स या सर्वांचं फारच अप्रूप असत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे केक ! नातलमध्ये केकला विशेष महत्व असत.भारत खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला देश आहे प्रत्येक धर्माचे सण समारंभ इथे आपण सर्वच मोठ्या उत्साहात साजरे करतो. नाताळचे त्याचसोबत येणाऱ्या नाव वर्षाचं स्वागत करण्यासाठी केक आवर्जून बनवला जातो किंवा ऑर्डर केला जातो पण केक हवाच ! 


बाजारात अश्या वेळी मिळणारे केक्स खूप महाग असतात शिवाय त्यात जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा असतो मग आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं ? पण टेन्शन कशाला घेता आज आपल्या यासेगमेंट मध्ये जाणून घेऊया मैदा न वापरता किंवा कमी वापरून घरच्या घरी ओव्हनशिवाय स्पॉंजी केक कसा बनवायचा ... 


अगदी काही मिनिटात होणार हा रवा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व खाऊ शकता...


साहित्य 


  • 1  बारीक रवा - 2 वाटी

  • 2  ताजे दही - 1 वाटी 

  • 3  पिठीसाखर - 1  वाटी 

  • 4  दूध - 1 वाटी 

  • 5  तूप - पाव वाटी

  • 6  व्हॅनिला इसेन्स - अर्धा चमचा  

  • 7  ड्रायफ्रूट आणि टूटीफ्रूटी - आवडीनुसार

  • 8  बेकिंग पावडर - 1 चमचा 

  • 9  बेकिंग सोडा - 1 चमचा 


कृती 


*  एक मोठं भांड घ्या त्यात तूप आणि साखर घाला आणि चांगलं एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. 


*  आता यात बारीक रवा घाला मग दही घालून पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. 


*  हे मिश्रण एकजीव झाल्यावर यात दूध (milk) आणि व्हॅनिला इसेन्स (vanilla essense) घाला आणि पुन्हा हे मिश्रण एकत्र फेटून घ्या , आता सर्व मिश्रण एकजीव केल्यावर झाकण ठेऊन द्या, अर्धा तास हे मिश्रण असच राहूद्या. 


ओव्हनशिवाय असा बनवा केक  (cake without oven)


*  एक कुकर घ्या त्याच्या तळाशी मीठ किंवा बेकिंग सोडा पसरून घ्या, त्यावर एक डिश ठेऊन केकचा ट्रे ठेवा आणि कुकर जवळपास १० मिनिट प्री -हिट करून घ्या. 



*  केकचे जे मिश्रण अर्धा तास भिजत ठेवलाय त्यात बेकिंग सोडा (baking soda) आणि बेकिंग पावडर (baking powder) घाला आणि पुन्हा एकत्र करून घ्या. 


*  आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला आवडत असल्यास टूटीफ्रूटी घाला  


*  कुकरचं भांड ज्यात एरव्ही डाळ किंवा भात बनवतो ते घ्या त्याला तळाशी तूप किंवा तेलाने ग्रीस करा  आणि तयार मिश्रण त्यात घाला. (cake without oven)


*  आता गॅस सुरु करा आधीपासून प्री हिट (pre hit ) झालेल्या कुकरमध्ये हे भांड ठेवून द्या आणि 30-35  मिनिटं  गॅस सुरु राहूद्या. 



(video courtesy: SpicesNFlavours baking tutorial)


*  30-35 मिनिटांनी भांड बाहेर काढून घ्या  आणि 10-15  मिनिट थंड होऊ द्यावं मग कडा मोकळ्या करून घ्याव्या.  (eggless cake making)


फ्रेश होम मेड  स्पॉंजी केक बनून तयार...