मुंबई : कोरोनाशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या युजर्सवर कारवाई करत सरकारने सोशल मीडियावरील अनेक पोस्ट आणि यूआरएल काढून टाकण्यास सांगितले आहे. ट्विटरने अलीकडेच अनेक ट्विट हटविली आहेत. ज्याद्वारे कोरोनाबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरली जात होती. ट्विटरच्या प्रवक्त्याने रविवारी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अकाऊंट बंद केले गेलेले नाहीत. त्यांना मेलद्वारे कारवाईची माहिती देण्यात आली आहे. खोट्या बातम्या पसरवत असल्याने ही कारवाई केली गेली असल्याचे सरकारने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, पीएम मोदींनी आज म्हटले आहे की, कोरोनाच्या या संकटात लसीचे महत्त्व सर्वांना माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतो. आपणा सर्वांना हे देखील ठाऊक असेल की भारत सरकारतर्फे सर्व राज्य सरकारांना मोफत लस पाठविली गेली आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक याचा लाभ घेऊ शकतात. आता 1 मे रोजी देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी ही लस उपलब्ध होणार आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी आपणा सर्वांना विनंती करतो की, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, तुम्हाला काही शंका असल्यास, माहिती योग्य क्रमांकावरून घ्या. काही प्रश्न असल्यास, डॉक्टरांशी फोनवर संपर्क साधा आणि सल्ला घ्या. पीएम मोदी म्हणाले की, ही लढाई जिंकण्यासाठी आम्हाला तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. भारत सरकार राज्य सरकारच्या प्रयत्नांना पुढे नेण्यात पूर्णपणे गुंतलेले आहे. राज्य सरकारही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी आपणा सर्वांना विनंती करतो की तुम्हाला काही माहिती हवी असेल, तुम्हाला काही शंका असल्यास, योग्य स्त्रोतांकडून माहिती घ्या. आपल्या जवळील फॅमिली डॉक्टरशी फोनवर संपर्क साधा आणि सल्ला घ्या.


ट्विटरने म्हटले आहे की, आम्ही कोरोनावरील चुकीची माहिती काढत आहोत. यासाठी आमचे प्रयत्न सुरु राहतील. हे आमचे प्राधान्य आहे.


दुसरीकडे, सरकारने ट्विटरवरील कारवाईवर म्हटले आहे की, कोविडची परिस्थिती नियंत्रित करण्याबाबत सरकारवर टीका करीत असल्यामुळे या खात्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. जुने फोटो आणि खोट्या बातम्यांद्वारे जनतेत अफवा आणि भीती पसरवली जात आहे. सरकारने सांगितले की बरेच ट्विटर हँडल 24 तास सरकारवर टीका करत आहेत, परंतु आम्ही ट्विटरला ते रोखण्यास सांगितले नाही.