देशात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या वर
देशातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी चार लाखांच्या वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी चार लाखांच्या वर पोहोचली आहे. देशामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 15968 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 183022 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 258685 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4476 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना चाचणीची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. पहिल्यांदाच एका दिवसात 2 लाख 15 हजार 195 चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत 73,52, 911 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, देशात कोरोनाची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या 1000 वर पोहोचली आहे. बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. ही देशासाठी दिलासा देणारी बाब आहे. आता ती वाढून सुमारे 56.71% झाली आहे.
भारतात सलग पाचव्या दिवशी 14 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत मृत्यू झालेल्या 465 रुग्णांपैकी 248 महाराष्ट्रात, दिल्लीत 68, तामिळनाडूमध्ये 39, गुजरातमध्ये 26, उत्तर प्रदेशात 19, पश्चिम बंगालमधील 11, राजस्थान आणि हरियाणा, कर्नाटकमधील प्रत्येकी 9 रुग्णांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात आठ जणांचा मृत्यू, पंजाब आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी चार, तेलंगणामध्ये तीन, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ, बिहार आणि पुडुचेरी मध्ये प्रत्येक एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
3,214 नवीन रुग्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. राज्यात एकूण संक्रमणांची संख्या 1,39,010 वर गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासात संक्रमणामुळे 248 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ज्यापैकी 75 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासात झाला आहे तर इतर रुग्णांचा मृत्यू आधी झाला आहे. आता एकूण मृतांचा आकडा 6,531 वर पोहचला आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या 1,39,010 वर गेली आहे. ज्यापैकी 3,214 रुग्णांची वाढ झाली असून एकूण मृत्यूची संख्या 6,531 वर पोहोचली आहे. 69,631 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून 62,833 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8,02,775 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.