Corona : देशात आज पुन्हा रुग्णांमध्ये मोठी वाढ, एकट्या महाराष्ट्रात इतके टक्के वाढ
Covid 19 cases : देशात पुन्हा एकदा गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
Corona cases in India : भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. कोरोनाची प्रकरणांमध्ये होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर पाडत आहे. गेल्या 24 तासांत 5 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या मंगळवारच्या तुलनेत 40.9 टक्क्यांनी अधिक आहे. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
सध्या भारतात कोरोनाचे 28,857 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 1881 सक्रिय रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र (1881 नवीन रुग्ण), केरळ (1494), दिल्ली (450), कर्नाटक (348) आणि हरियाणा (227) इतक्या रुग्णांची वाढ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण नवीन प्रकरणांपैकी 84.08 टक्के या राज्यांतील आहेत. एकूण नवीन प्रकरणांपैकी 35.94 टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत.
गेल्या 24 तासात देशात 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 14 लाख 94 हजारांहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 194 कोटींहून अधिक कोविड लस देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाकडून आता सतर्क राहण्याच्या सूनचा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मास्क वापरणं बंधनकारक नसलं तरी देखील काळजी म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये धोका कमी असला तरी संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट यासाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.