मुंबई : ब्राझील किंवा अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची होणारी वाढ आता सातत्याने वाढत आहेत. भारतात दर 24 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहेत. हेच प्रमाण ब्राझीलमध्ये 47 दिवस आणि अमेरिकेत 65 दिवस आहे. भारतात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी इतर देशांच्या तुलनेत कमी दिवस असल्याने सरकारच्या चिंता कायम आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्याची कालावधी वाढत आहे. अमेरिकेत दुसऱ्या लाटेनंतर रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहेय. पण भारत जगातील सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट देश बनण्याच्या मार्गावर दिसतं आहे.


कोरोनाचा प्रसार झाल्यापासून पहिल्यांदाच, सात दिवसात भारतातील कोरोना रुग्ण वाढण्याची सरासरी अमेरिका किंवा ब्राझीलपेक्षा जास्त आहे. या दोन देशांपेक्षा भारतात दररोज नवीन रुग्ण वाढण्याची प्रमाण जास्त आहे.


11 ऑगस्ट रोजी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनीअरिंग (जेएचयू सीसीएसई) च्या म्हणण्यानुसार, भारतात दररोज होणारी रुग्णांची वाढ ही 60 हजारांच्या जवळपास आहे. ज्याची आठवड्याभरातील सरासरी अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे.


ब्राझीलमध्ये जुलैच्या अखेरीस कोरोना रुग्णांची वाढ समान राहिली आहे. अमेरिकेने देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्ण संख्या वाढण्याचं प्रमाण काही प्रमाणात कमी केलं आहे. भारतात मात्र याचा आलेख वाढताच आहे.


22 जुलै रोजी अमेरिकेत एकाच दिवसात 67,000 नवीन रुग्णांची वाढ झाली होती. जी जगातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती. भारत या संख्येच्या अगदी जवळ पोहोचला आहे.


रविवारी 16 ऑगस्ट रोजी भारतात एकूण मृतांचा आकडा 50,000 वर गेला आहे. कोरोनामुळे मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोनंतर भारत हा जगातील चौथा देश आहे.