नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना काहींन कोरोनाची लागण झाली आहे. काहींचा मृत्यू झालाय. तसेच या धार्मिक कार्यक्रमात सहभागी लोक देशाच्या अनेक राज्यांतील आहेत. ते त्या त्या राज्यांत परतल्यानंतर कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. देशात कोरोनामुळे १८३४ जण बाधित असून कोरोनामुळे ४१ जणांचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. तर देशभरातील १४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


धार्मिक कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुद्ध, केंद्र सरकार कठोर कारवाई करणार आहे. अशा लोकांना काळ्या यादीत टाकलं जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली आहे.


देशभरात २४ तासात ३८६ नवे रुग्ण


देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ३८६ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या १ हजार ६३७ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे अठरा रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२० वर गेला आहे. १८ रुग्णांपैकी सोळा रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर दोन रुग्ण पुण्यात सापडले आहेत. 


सर्वांची चाचणी करण्याचे आदेश


या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांवर नजर ठेवून या सर्वांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात नागपुरातले ५४ जण सहभागी झाले होते आणि त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे.