नवी दिल्ली : कोरोना  व्हायरस पसरु नये यासाठी संसदेत आज स्वच्छतेची मोहीत हाती घेतली. संसद केमिकलने धुवून काढली. तसेच फवारणी करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संपूर्ण संसद सॅनिटाईज करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोकसभा, राज्यसभा सभागृह स्वच्छ करण्यात आले. तर महत्त्वाची कागदपत्रेही सॅनिटाईज करण्यात आली. दरम्यान, बॉलिवडू गायिका कनिका कपूर हिच्या पार्टीत भाजप खासदार दुष्यंत सिंह आणि त्यांची आई वसुंधराराजे शिंदे या सहभागी झाल्या होत्या. कनिकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात दुष्यंत हे आल्याने तेही कोरोना पॉजिटिव्ह आहेत. त्यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक खासदार आलेत. कोरोनाचा संसर्ग संसदेत पोहोचल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) झपाट्याने फैलाव होत असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचे संकट आता थेट संसदेपर्यंत येऊन पोहोचले आहे. सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही हे अधिवेशन स्थगित करण्यात आले नव्हते. मात्र, आता खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपण काही दिवस भाजप नेते दुष्यंत सिंह यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली आहे. 



कनिका ही लंडनमधून भारतात आली. मात्र, तिला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती लपवली होती. तिने तीन पार्टीला हजेरी लावली. तसेच तिने लखनऊ येथे ताज हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. तसेच तिच्या पार्टीत १०० सेलिब्रिटीज उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याची मोठी शक्यता आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार दुष्यंत सिंह कोरोना पॉजिटिव्ह आहेत. बॉलिवुडची गायिका कनिका कपूरच्या लखनऊ येथील एका पार्टीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला वेगळं करुन घेतलं होतं. सोबतच त्यांची आई आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे या देखील इतरांपासून लांब झाल्या आहेत. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाल्याच्या तीन दिवसानंतर खासदार दुष्यंत सिंह १८ मार्चला राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील खासादारांना राष्ट्रपती भवन येथे नाश्तासाठी आमंत्रित केलं होते. या कार्यक्रमाचा एक फोटो ही समोर आला आहे. ज्यामध्ये दुष्यंत सिंह हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मागे उभे आहेत. पण राष्ट्रपतींनी या दरम्यान त्यांना हात मिळवला नसल्याचं राष्ट्रपती भवनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.