मुंबई : देशात कोरोना विषाणू रुग्णांचा सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १३,५८६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसातील मोठा आकडा आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. यामध्ये रुग्णालयात १ लाख ६३ हजार २४८ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दोन लाख चार हजार ७११ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या देशातील नागरिकांची चिंता वाढवत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९६ टक्के आहे. एकूण दोन लाख ४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहे. एक लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या. ७.७८ टक्के रुग्णांची करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत.



महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण एक लाख २० हजार ५०४ पर्यंत वाढले आहे आणि तामिळनाडूमध्ये ते ५२ हजार ३३४ वर पोहोचले आहे.


दिल्लीत कोरोना प्रकरणांची संख्या ४९,९७९ आहे आणि सक्रिय प्रकरणे २६६६९ आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये कोरोनाचे २१२११ रुग्ण बरे झाले असून १९६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित राज्यांच्या यादीत दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आहे.