मुंबई : कोरोना विषाणूबाबत (Coronavirus) आपण सतर्क नसाल आणि काळजी घेण्याबाबत जरातरी कानाडोळा केला तर समजा तुम्हाला कोरोना (COVID-19) झाला म्हणून समजा. हे का म्हणतोय, त्याचे कारणही तसेच आहे.  संक्रमित झालेल्या व्यक्ती जवळ 1 मिनिट राहिल्यास कोरोना होतो. दिल्लीत वाढणाऱ्या कोरोना बाधितांवरुन हे स्पष्ट झाले आहे.  दिल्लीत कोरोना रुग्ण संख्या वाढीला हे कारण असल्याचे पुढे आले आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात दहा मिनिट राहले तर धोका जास्त होता. आता या वेळेत घट होऊन केवळ एक मिनिटही पुरेसे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण मास्क शिवाय कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तर एका क्षणात कोरोना विषाणू आपल्याता गिळकृत करेल, याचीच भीती आहे.  दिल्ली आणि शहराच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भावाचे हे प्रमुख कारण मानले जात आहे.  याबाबत बीएलके सुपर स्पॅलिटी हॉस्पिटलची रेस्पेरेट्री एक्सपर्ट डॉ. संजीव नय्यूर यांनी सांगितले, 'व्हायरस खूप वेगवान आहे. तो अनेकांना संक्रमित करत आहे. एक मिनिटात कोरोना बाधित होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात दहा मिनिट राहले तर धोका जास्त होता. आता तशी स्थिती नाही. केवळ एक मिनिटही पुरेसे ठरत आहे. डॉक्टर संजीव यांनी सांगितले की, दिल्लीत 30 ते 40 वर्षांपर्यंतची सर्वात जास्त युवक संक्रमित झाले होत आहेत. कारण यांचा धोका जास्त आहे. हे लोक घराबाहेर पडलेल आहेत.


घरात एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली तर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे कोरोना संक्रमित होते. तुम्ही कितीही क्वारंटाई झाले तरी एकत्र राहणारे लोक कोरोनापासून वाचू शकणार नाहीत. या विषयी डॉक्टर डी.के. दास यांनी सांगितले, सुरुवातील रुग्णाला मोठी समस्या येते ती म्हणजे श्वास घेताना त्रास होतो. आता गॅस्ट्रो अर्थात उल्टी, जुलाब याची समस्या निर्माण होत आहे. तसेच त्वचा लाल होते. त्वचेवर लाल लाल बारीक फोड येतात. म्हणजेच आता लक्षण वेगळी दिसत आहेत.