मुंबई : महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.  गेल्या 24 तासात देशात 22,854 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. महाराष्‍ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. नागपूरमध्ये कोरोनामुळे 15 ते 21 मार्च पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरण देखील वेगाने सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यूदर 1.4 टक्के आहे. तर सक्रीय रुग्णांचा दर 1.6 टक्के आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 22,854 रुग्ण वाढले आहे. ज्यामध्ये 13,659  रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. एकूण रुग्णांच्या 60 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे. यानंतर केरळमध्ये 2,475 आणि पंजाबमध्ये 1,393 रुग्णांची वाढ झाली आहे.


पीटीआयनुसार आठ राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडु, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. देशात सध्या 1,89,226 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, देशात संक्रमित लोकांची संख्या 1,12,85,561 झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंजाबमध्ये  17 आणि केरळमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1,58,189 झाली आहे.


24 तासात 19 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या राज्‍यमध्ये पुडुचेरी, लक्षद्वीप, सिक्किम, लडाख, मणिपूर, दीव-दमन, दादर-नगर हवेली, मेघालय, मिझोरम, नगालँड, त्रिपुरा, अंदमान किंवा निकोबार, अरुणाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, गोवा, झारखंड याचा समावेश आहे. 


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 52,610, तमिळनाडुत 12,530, कर्नाटकात 12,379, दिल्लीत 10,931, पश्चिम बंगालमध्ये 10,283, उत्तर प्रदेशमध्ये 8,740 आणि आंध्र प्रदेशमध्ये 7,177 लोकांचा मृत्यू झाला आहे.


देशात आतापर्यंत 2.43 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोविड वॅक्‍सीनची 71 टक्के डोस हा सरकारी तर 28.77 टक्के डोस हा खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात आली आहे.