Covid-19 JN.1 Variant : जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. हिंवाळा सुरु होताच पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोकाही वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगात पसरतोय. देशात 8 डिसेंबरला नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला होता. अवघ्या बारा दिवसात ही संख्या 2000 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सर्व राज्य सरकारने सतर्कतेचा (Alert) इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला रुग्ण केरळात (Kerla) सापडला होता. पण आता याचे रुग्ण महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातही सापडले आहेत. काही दिवसांवर ख्रिसमस आणि नव वर्ष येतंय. अनेकांनी सुट्टीत फिरण्याचा प्लान बनवला असाणार. अनेकजण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात असतात. पण नव्या व्हेरिएंटमुळे पर्टकांनी सावधनता बाळगण्याची गरज असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 


नव्या वर्षाची पार्टी करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण करणं, याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं आवाहनही करण्यात आलं आहे. 


सॅनिटायझर आणि मास्क सोबत ठेवा
आरोग्य विभागाने पर्यटकांना सोबत सॅनिटायझर आणि मास्क ठेवण्याचा सल्लाही दिलाय. पार्टीत जाण्याआधी आपल्या आरोग्याची तपासणी करण्याबरोबरच कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहनही सरकारने केलंय. 


सर्व राज्यात अलर्ट
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता सर्व राज्य सकार सतर्क झाले आहेत. सर्व राज्य सरकारने जिल्हा आणि खासगी रुग्णालयात अतिरिक्त सुविधा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


महाराष्ट्रात कोरोनाचे 13 रुग्ण आढळले
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 13 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. आढळलेले सर्व 13 रुग्ण मुंबईतले आहेत. पण या रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आढळली असून चिंता करण्याचं कारण नससल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. पण खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


गेल्या 24 तासात 614 रुग्ण
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 614 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी 21 मे रोजी 600 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आता सर्वाधक रुग्णांची नोद झाली आहे. देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या 2311 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळात गेल्या चोवीस तासात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5 लाख 33 हजार 321 इतकी झाली आहे.