मुंबई : आपला देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सोमोरं जात आहे, त्यात आता कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार असल्याचा इशारा केंद्र सरकारच्या आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. ज्यामध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालंकांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. परंतु पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण लहानमुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AIMS चे डॉक्टर रणदीप गुलेरियांनी असे वक्तव्य केली की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. रणदीप गुलेरिया हे कोविड टास्क फोर्सचे एक प्रमुख सदस्य आणि एक सुप्रसिद्ध पल्मोनोलॉजिस्ट देखील आहेत.


रणदीप गुलेरिया यांनी हे वक्तव्य करताना सांगितले की, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या संपल्यानंतर सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा डेटा समोर येईल. त्यानंतर त्याच महिन्यात, या लसीला लहान मुलांना  देण्यासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. एम्सच्या संचालकांनी असेही म्हटले आहे की, जर फायझर-बायोटेकच्या लसीला भारतात ग्रीन सिग्नल मिळाला तर, ती लस देखील मुलांना देण्यात येऊ शकते.


दिल्ली एम्सने पूर्वीपासूनच मुलांची स्क्रीनिंग सुरू केली आहे. 7 जूनपासून मुलांवर लसीची चाचणी सुरू झाली आहे. चाचणीत 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. 12 मे रोजी DCGIने भारत बायोटेकला दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिनची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.


डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, सेरो सर्वेक्षणात मुलांमध्ये अँटीबॉडी उत्पादनाकडे लक्ष वेधले गेले आहे. ते म्हणाले की, "जेव्हा मुले चाचणीसाठी येतात तेव्हा आम्हाला त्यामध्ये अँन्टीबॉडीज सापडल्या आहेत. याचा अर्थ असा की, मुलेही कोरोना संसर्गाचे शिकार झाले आहेत. त्यामुळे लसीशिवाय, त्यांच्यात अँन्टीबॉडी नैसर्गिकरित्या विकसित होऊ शकतात."


एम्स आणि डब्ल्यूएचओ यांच्या अभ्यासानुसार मुलांमध्ये उच्च सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली. त्यामुळे या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, कोविड संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना जास्त त्रास होणार नाही.


देशात संपूर्ण लसीकरणासाठी 207 दिवस लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रौढ लोकांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी देशाला 88.89 कोटी लोकांचं लसीकरण करावं लागणार आहे. सोमवारी देशभरात 85 लाख लोकांना लस देण्यात आली. यामुळे ऑगस्टपर्यंत रोज एक कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.