मुंबई : कोरोना संसर्गाचा (Coronavirus)धोका कायम दिसून येत आहे. प्रादुर्भावर कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोविड (COVID-19) संक्रमणाची संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) परिस्थितीही चिंताजनक आहे. लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु तरीही सर्व लोक नियमांचे पालन करीत नाहीत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रानंतर दिल्ली सरकारही कठोर पावले उचल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आता येथे रात्रीची संचारबंदी (Night curfew)लागू करण्यात येणार आहे.


'नाईट कर्फ्यूवर चर्चा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता दिल्ली सरकार नाईट कर्फ्यू (Night curfew) लावण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, 'नाईट कर्फ्यू (Night curfew)लावण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. यावर सविस्तर चर्चा सुरु आहे, त्याचबरोबर कर्फ्यूचा वेळही विचारात घेण्यात येत आहे, कर्फ्यूची वेळ रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत असू शकते. '


मायक्रो-कंटेस्टमेंट झोन तयार 


सोमवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते की, कोविड -19 चे एका दिवसात तीनपेक्षा जास्त प्रकरणे नोंदविली जातील आणि त्या भागांना मायक्रो-कंटेन्ट झोन म्हणून घोषीत केले जाईल. ते म्हणाले की कोविड -19चा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच राष्ट्रीय राजधानीत मायक्रो-कंटेस्टमेंट झोन तयार करेल. कोरोना कसोटीवर अधिक भर दिला जात आहे. सत्येंद्र जैन यांनी राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करत असल्याचा दावा केला.


सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल दंड


 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी शुक्रवारी सांगितले की, दिल्लीला संसर्गाच्या चौथ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. परंतु लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची इच्छा नाही. मात्र, दिल्लीत सातत्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल दंडासह गुन्हा दाखल केले जात आहेत. बर्‍याच रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि मास्क न घालण्यावर दंड आकारला जात आहे.


सोशल डिस्टनचे  (Social Distancing) पालन करणे देखील अनिवार्य आहे आणि सार्वजनिक ठिकाणी हे नियम लागू आहेत. हे नियम कोणी तोडले तर त्याला दंड आकारला जाईल. मेट्रोमध्येही गर्दी असलेल्या भागात लोक ओळखले जात आहेत, जे कोरोना नियमांचे योग्य पालन करीत नाहीत.