नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण सतत वाढत आहेत. गुरुवारी देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महामारीमुळे आतापर्यंत 681 लोकांचा बळी गेला आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 21393 वर पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या घटनांची स्थिती खालीलप्रमाणे आहेः


आतापर्यंतचे एकूण रुग्ण - 21393


आजपर्यत पोझेटीव्ह रुग्ण - 16454


मृत्यू - 681


बरे झाले - 4258


देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात असून तेथे आतापर्यंत एकूण 5652 रुग्ण आढळले आहेत. तर 269 लोकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातही 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.


बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशात 20471 रुग्ण होते तर 652 लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत या महामारीमुळे देशभरात एकूण 1000 रूग्ण वाढले आहेत आणि तीस हून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. 


दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना विषाणूपासून बरे होणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. या साथीच्या आजाराशी लढा देऊन आतापर्यंत जवळपास 4258 लोकं बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे.


गेल्या काही दिवसांत देशात चाचणीचा वेग वाढला आहे, म्हणूनच प्रकरणे सतत वाढत आहेत. दुसरीकडे, चीनकडून रॅपिड टेस्टिंग किटच्या काही तक्रारी आल्यानंतर आयसीएमआरने त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.


विशेष म्हणजे कोरोनामुळ देशात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुढील रणनीतीबाबत चर्चा करतील. यामध्ये लॉकडाऊन कसे उघडायचे यावर रणनीती आखली जाऊ शकते.