मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. दररोज देशात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या वर आहे. आतापर्यंत देशात १.६५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जानकारांचं म्हणणं आहे की, कोरोनाचे रुग्ण पीकवर येणे अजून बाकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे माजी अध्यक्ष केके अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होणारी मोठी वाढ अजून बाकी आहे. काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढणार आहेत.


केके अग्रवाल यांनी म्हटलं की, कोरोना जेव्हा पीक टाईमवर पोहोचेल तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या ४ ते ५ पट्टीने आणखी वाढले. दिल्लीत काल हजार रुग्ण वाढले. १५ दिवसापूर्वी ५०० रग्ण रोज वाढत होते. आता १५ दिवसानंतर २ हजार रुग्ण रोज वाढण्याची शक्यता आहे.


केके अग्रवाल यांच्या मते,  भारतात डबलिंग रेट सध्या १३ दिवस आहे. हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढतील. दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडु आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढू लागतील. देशात सर्वाधिक रुग्ण याच राज्यांमध्ये आहेत.