कोरोनाच्या रुग्णांना होऊ शकतो मधुमेह, ICMR ने सांगितलं कारण
कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतर आजारांचा धोका का वाढतोय?
मुंबई : देशातील वैद्यकीय संशोधनावर काम करणारी सर्वात मोठी सरकारी संस्था ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) ने कोरोनाबाबत मोठा इशारा दिला आहे. आयसीएमआरने म्हटलं की, कोरोनाव्हायरस आजारामुळे मधुमेह देखील होतो.
कोरोना व्हायरसमुळे मधुमेह
आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलाराम भार्गव म्हणाले की, कोरोना महामारीमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) रुग्णांना मधुमेह (Diabetes) देखील होऊ शकतो. ते म्हणाले की कोरोनाचा मध्यम संसर्ग झालेल्या रूग्णांसाठी 2 डीजीचे औषध योग्य आहे. हे औषध कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी योग्य नाही.
आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, संक्रमित व्यक्ती 1 महिन्यात 406 लोकांना संसर्ग पसरवू शकतो. ते म्हणाले की परिस्थिती सुधारत आहे, परंतु अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या देशात सातत्याने चाचणी वाढवण्याची गरज आहे. पुढील महिन्यापर्यंत देशात दररोज 45 लाख लोकांची चाचणी घेण्यात येणार आहे.
म्युकरमायकोसिसचा धोका
ते म्हणाले की, बुरशीजन्य संसर्ग ओलाव्यामध्ये विकसित होतो. जर एखाद्याकडे रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर ते बुरशीचा आजार वाढेल. म्हणूनच ही समस्या कोविड रूग्णांमध्ये होत आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती इतरांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात ही समस्या अधिक दिसून येत आहे.
त्याच बरोबर, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसच्या सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 69 टक्के प्रकरणे 8 राज्यात आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे (Ministry of Health) सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, आम्ही सतत चाचणी वाढवत आहोत. गेल्या दोन दिवसांपासून देशात 20 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर कंटेनमेंट झोन तयार करण्याच्या रणनीतीमुळे त्याचा परिणाम दिसून येत आहे.
8 राज्यात 1 लाखाहून अधिक प्रकरणे
ते म्हणाले की, देशात 8 राज्ये असून, अद्याप 1 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. देशात असे एकूण 30 जिल्हे आहेत, जिथे दररोज कोरोनाचे 100 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत, एका दिवसाची हलगर्जीपणा देखील भारी होऊ शकते.