इंदौर: सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या Coronavirus विळख्यात सापडला असली तरी काही सकारात्मक घटनांमुळे लोकांना लढण्यासाठी नवी उमेद मिळत आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्येही नुकतीच अशीच घटना घडली. येथील इंडेक्स मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने मुलीला जन्म दिला. शुक्रवारी या दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र, या महिलेच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाशी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहावा म्हणून तिने आपल्या मुलीचे नाव चक्क सॅनिटायझर असे ठेवले. रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि परिचारिकाही या चिमुरडीला सॅनिटायझर याच नावाने हाक मारत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनविरोधात ट्विट केल्यामुळे 'अमूल'चं ट्विटर अकाऊंट बंद?


इंदौरमध्ये राहणाऱ्या भारती यांच्या कुटुंबातले सर्वच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. अशातच भारती यांच्या सासऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाढली होती. कुटुंबातले सगळेच सदस्य क्वारंटाइन असतानाच त्यांना नववा महिना लागला होता. शहरातल्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. 


रडत रडत चिमुकलीने मागितली मुख्यमंत्र्यांची माफी; VIDEO VIRAL


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भारती यांना इतरांपासून वेगळे ठेवून त्यांची योग्य ती काळजी घेतली. मात्र, तरीही आपल्या बाळाला कोरोनाची लागण होईल, याची भीती भारती यांना वाटत होती. मात्र, जन्मानंतर त्यांच्या मुलीची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर भारती यांनी मुलीचे नाव सॅनिटायझर ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्या पतीने या निर्णयाला विरोध केला. अखेर भारती यांच्या हट्टापुढे त्याने नमते घेतले. भारती यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आता कोरोनामुक्त झाले आहेत.