मुंबई : कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाव्हायरसचे  (Coronavirus in Maharashtra) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तसेच कोरोनावरील उपचार सगळ्यांनाच परवडणारा नाही. राज्य सरकारने काही औधषांच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, हॉस्पीटलचे बिल पाहून अनेकांना धडकी बसते. अशावेळी करायचे काय, असा प्रश्न पडतो. आता देशातील सर्वात मोठी बँक SBI ने (State Bank of India) कोरोना रक्षक पॉलिसी बाजारात आणली आहे. त्यामुळे याचा अनेकांना फायदा होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे आपण देखील कोरोनाबाधित झाला असाल आणि उपचारांच्या खर्चाबद्दल काळजीत असाल तर घाबरुन जाऊ नका.  एसबीआयने (State Bank of India) तुमच्या कोरोना खर्चासाठी एक खास योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 156 रुपयात त्याचा लाभ घेऊ शकता. बँकेच्या या योजनेचे नाव कोरोना रक्षक पॉलिसी आहे.  


SBIकोरोना रक्षक पॉलिसी 


- SBI कोरोना रक्षक पॉलिसी ही आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
- एसबीआय कोविड पॉलिसी कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय जारी केली जाते
इथे तुम्हाला 100 टक्के कव्हर मिळेल.
- कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठीचे किमान वय 18 वर्षे आहे.
- कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये किमान 156 रुपये आणि कमाल 2,230 रुपये प्रीमियम आहे.
- एसबीआयच्या कोरोना रक्षक पॉलिसीचा कालावधी 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवस आहे.
- एसबीआय पॉलिसीमध्ये किमान 50 हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
-  50 हजार रुपयांचे कव्हर मिळविण्यासाठी 157 रुपये द्यावे लागतात.
- कोरोना पॉलिसीबद्दलच्या अधिक माहितीसाठी ग्राहक 022-27599908 वर एक मिस्ड कॉल देऊ शकतात.
- SBI कोरोना रक्षक पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सिंगल प्रीमियम श्रेणीमध्ये दिले गेले आहे.


 अधिक माहितीसाठी https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak या लिंकवर भेट देऊ शकता.