Corona Return : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) प्रकोप पाहिला मिळतोय. गेल्या काही दिवसात हजाराहून अधिर रुग्णांची नोंद होत असून गेल्या चोवीस तासात तब्बल 1300 नव्या कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 140 दिवसांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत. देशात सध्या 7605 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट (Covid New Wave) येण्याची भीती व्यक्त केली जात  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाटी लाट?
 एका दिवसात रुग्णसंख्या दीड हजारांच्या पार जातेय. सध्या देशात कोरोनाचा XBB व्हेरियंट पसरतोय. मात्र आता त्याचाच सबव्हेरियंट XBB 1.16ची एन्ट्री झालीय.  नव्या व्हेरियंटमुळे कोविडची नवी लाट येण्याची भीती आहे. हा व्हेरियंट फारसा घातक नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, पण हा व्हेरिएंट वेगाने पसरतोय. महत्त्वाचं म्हणजे नव्या व्हेरियंटचे देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ गुजरात, केरळ, कर्नाटकचा नंबर आहे. तर जगभरात आजही कोरोनाचे १ लाख रुग्ण सापडतायत 


सरकारने जारी केली सूचना
देशात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. याबाबत दिल्ली एम्सचे माजी प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार  XBB 1.16 व्हेरिएंट नवा आहे. गेल्या एका वर्षात सापडेले व्हेरिएंट हे ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट आहेत. आधीप्रमाणे व्हेरिएंटमध्ये वेगाने बदल होत नाहीएत. 


फ्ल्यूची लक्षणं आढळल्यास तपासणी करा
देशात पुन्हा एकदा चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं डॉ गुलेरिया यांनी म्हटलं आहे. फ्ल्यू सारखी लक्षणं आढळल्यास अनेक जणं त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नेमका आकडा कळू शकणार नाही. त्यामुळे प्ल्यूची लक्षणं आढळल्यास तपासणी करण्याचं आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केलं आहे. 


नव्या व्हेरिएंटची लक्षणं सौम्य असून रुग्णालयात दाखल होण्याइतपत गंभीर परिस्थिती नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक धोकादायक असल्याचं मानलं गेलंय. 


या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
नवा व्हेरिएंट सौम्य असला तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. ताप, डोकेदुखी, थकवा, घश्यात खवखव, सर्दी, खोकला, पोटदुखी अशी लक्षणं आढळल्यास तपासणी करुन घ्या. 


देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच H3N2 एन्फ्लुएन्झाचं नवं संकट आपल्यासमोर आहे. आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आल्यामुळे हे संकट आणखीच ग़डद झालंय. त्यामुळे कोरोना संपलेला तर नाहीच पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे सावध राहा आणि खबदारी घ्या.