मुंबई :  कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Virus) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. यानंतर सर्वसामान्यांचीच नव्हे तर अधिकाऱ्यांचीही चिंता वाढली आहे. अलीकडेच, काही तज्ञ आणि आयआयटी कानपूरच्या अभ्यासात असे समोर आले आहे की कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येणार आहे. (corona situation in the country what is coming 4th wave see what say icmr)


आयसीएमआरने काय म्हटलं? (ICMR)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाची  इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दखल घेतली आहे.  वृत्तसंस्थेशी बोलताना ICMR चे समीरन पांडा म्हणाले, 'चौथी लाट येत आहे असे म्हणणे चुकीचं ठरेल. आम्हाला जिल्हा स्तरावर आकडेवारी तपासावी लागेल. काही जिल्ह्यांतील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे देशभरातील रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा नवी व्हेरिएंट येतोय का? यावर पांडा म्हणाले, प्रत्येक प्रकार चिंताजनक नसतो, त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये", असं पांडा यांनी स्पष्ट केलं. 


मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर


राज्यात आज (10 जून) 3 हजार 81 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 24 तासांमध्ये मुंबईत 1 हजार 956 जणांना कोरोना झाला आहे. गुरुवारी राज्यातील आकडा हा  2 हजार 813 इतका होता. तर मुंबईत 1 हजार 702  इतके पॉझिटिव्ह होते.


सक्रीय रुग्णांमध्ये वाढ


दैनंदिन रुग्णांसह सक्रीय रुग्णांमध्ये म्हणजेच कोरोनावर उपचार घेत असलेल्यांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सध्या 13 हजार 229 जणांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी सक्रीय रुग्णांचा आकडा हा 11 हजार 571 इतका होता.