मुंबई : Covid-19: कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. जगात तिसरी लाट आली आहे. तसे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. सुरुवातीला 144 देशांत ही लाट आल्याचे सांगण्यात आले. डेल्टा व्हेरियंट हा तिसऱ्या लाटेचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आता भारतात दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.  केरळमध्ये परिस्थिती अनियंत्रित होत चालली आहे. सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये  (Kerala) कोरोना महामारी कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. तेथे कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्यात  सलग चौथ्या दिवशी, शुक्रवारी, कोरोनाव्हायरस संसर्गाची 20 हजारांहून अधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 116 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा दर 13.61 टक्के आहे.


एकूण संक्रमितांची संख्या सुमारे 34 लाख  


राज्य सरकारने सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूची एकूण संख्या 33 लाख 70 हजार 137 झाली आहे. यापैकी 31 लाख 92 हजार 104 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 60 हजार 824 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजारांहून अधिक मृत्यू


केरळ राज्यात  (Kerala) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 16 हजार 701 झाली आहे. केरळ सरकारने सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 1 लाख 52 हजार 639 लोकांचे कोरोना नमुने घेण्यात आले. यासह, राज्यातील एकूण तपासणीची आकडेवारी आता 2 कोटी 70 लाख 49 हजार 431 झाली आहे.