Mask mandatory : कोरोनाचा (Corona) आलेख घसरत असतानाच गेल्या काही दिवसात देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राजधानीत मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मास्क न लावल्यास 500 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळा सध्या सुरुच राहणार
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली देखील जारी केली जाणार आहे, ज्यामध्ये कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. असं असलं तरी डीडीएमएच्या (DDMA) बैठकीत तूर्तास शाळा बंद न ठेवण्यावर एकमत झालं आहे.


दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर मास्क बंदी हटवण्यात आली होती. तेव्हापासून लोकांनी मास्क घालणं सोडून दिलं होतं. पण पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे.


कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
राजधानीत दिल्लीत 11 ते 18 एप्रिल दरम्यान संसर्गाचे प्रमाण जवळपास तीन पटीने वाढले आहे. दिल्लीत मंगळवारी 632 रुग्णसंख्या आढळली. त्यामुळे दिल्लीत सक्रिय रुग्णसंख्या 1900 इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहेत.