नवी दिल्ली : कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे. कोविड (covid-19) रोखण्यासाठी आता 13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला (Corona vaccine) सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात 13 जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर 10 दिवसांनी लसीकरण अभियान सुरू करण्याची योजना आरोग्य मंत्रालयानं तयार केली आहे.


कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी 3 जानेवारीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 13 जानेवारीला लसीकरण अभियान सुरू करण्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचंही भूषण यांनी नमूद केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.