नवी दिल्ली : भारत बायोटेक आणि आईसीएमआरची स्वदेशी Covaxin पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्याची आनंदाची बातमी समोर येतेय. झालेल्या परिक्षणात ही वॅक्सिन सुरक्षित ठरलीय. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांना वॅक्सिन देण्यात आली. केवळ एका व्यक्तीमध्ये साईड इफेक्ट आढळला. पण Covaxin हे त्यामागचं कारण नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रुग्णास ३० जुलैला वॅक्सिन देण्यात आली. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाली. १५ ऑगस्टला त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि २२ ऑगस्टला त्याला सुट्टी मिळाली. पण वॅक्सिनशी या घटनेला जोडले जात नाहीय. 


वॅक्सिन दिल्यानंतर इंजेक्शनच्या ठिकाणी काहींना थोडं दुखलं जे काहीवेळाने बरं झालं. वॅक्सीनला २ ते ८ डिग्री सेल्सियसवर साठवण्यात आलं आणि वॅक्सिनची गुणवत्ता देखील कायम ठेवण्यात आलीय. हे वॅक्सिन घरी असलेल्या फ्रिजरमध्ये साठवून ठेवता येईल. 


३७५ पैकी ३०० जणांना वॅक्सिन देण्यात आले. तर ७५ स्वयंसेवकांना साधारण इंजेक्शन देण्यात आले. याला मेडिकलच्या भाषेत प्लेसिबो असं म्हणतात. दरम्यान कोणला वॅक्सिन दिलीय आणि कोणाला औषध दिलंय याबाबत स्वयंसेवकांना माहिती नसते. 


वॅक्सिनने एंटीबॉडी तयार करण्याचे काम केले. एका गंभीर घटना समोर आला पण त्याचा वॅक्सिनशी काही संबंध नव्हता. त्याला कोणतेही औषध द्यावे लागले नाही. दुसऱ्या डोसनंतर हा परिणाम दिसला.