नागपूर : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पुरवठ्याच्या अडचणी आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात लसींचे उत्पादन होत नसल्याने लसीकरण संथ गतीने सुरू आहे. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तम कल्पना सुचवली आहे.  देशातील मोजक्या विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये गडकरी यांनी ही नामी कल्पना सुचवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितिन गडकरी म्हटले की, 'कोणत्याही वस्तूचा मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर, अडचणी येतातच. हेच लशींच्या बाबतीतही लागू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करतो की, त्यांनी देशातील आणखी दहा कंपन्यांना लसीचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. लस बनवण्याचा फार्मुला आताच्या कंपन्यांनी इतर कंपन्यांना द्यावा. त्यासाठी हवं तर 10 टक्के रॉयल्टी घ्यावी. यामुळे लशीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल'.



अरविंद केजरीवाल यांनी देखील दिला सल्ला


कोरोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा दूर करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी पत्र लिहले होते. त्यांनी देखील लशीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इतर कंपन्यांना लस निर्मितीचा फॉर्मुला द्यावा असे म्हटले होते. 


भारतात सध्या भारत बायोटेक कोवॅक्सिनची निर्मिती करत आहे. तर सीरम इंन्स्टिट्यूट कोवीशिल्डची निर्मिती करीत आहे.