मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारतातही कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लस घेतलेल्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. याचं कारण खास आहे. डॉक्टरनं आपल्या पत्नीसोबत केलेलं संभाषण या व्हिडीओमधून व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आल्याशिवाय राहणार नाही. 


कार्डियोलॉजिस्ट आणि पद्मश्री डॉक्टर के. के अग्रवाल यांचा हा व्हिडीओ आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी ते सेंटरवर पोहोचले. तिथे त्यांनी लस घेतली आणि पुन्हा आपल्या कामाला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी गाडीत असताना त्यांनी पत्नीला फोन केला. कोरोनाची लस घेतल्याची बातमी तिला दिली. त्यानंतर जे फोनवर संभाषण झालं ते डॉक्टरांनी रेकॉर्ड केलं. 
 




कोरोनाची लस घेतली इतकं सांगायची खोटी की पत्नी त्यांच्यावर संतापली. तुम्ही मला लस घेण्यासाठी सोबत का घेऊन गेला नाहीत? असा प्रश्न पत्नीने विचारला. तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात, तुम्ही मला सोबत घेऊन गेला नाहीत असं पत्नी संतापून बोलत होती. डॉक्टरांनी तिला घडलेला प्रकार सांगितला. 


तिथे मी माहिती घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी गर्दी नव्हती त्यामुळे मला तिथे लस घेण्यासाठी सांगण्यात आलं. मी गर्दी नसल्यानं लस घेतली आणि तिथून निघालो असं त्यांनी पत्नीला सांगितलं. शेवटी पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टीव्हीवर लाईव्ह दिसत असल्याचं सांगितलं. या दोघांमधील फोनवरील संभाषण तुफान व्हायरल होत आहे. 


माझा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हे मला माहीत आहे. मला हे आवडले की या कठीण काळातही मी लोकांना हसण्यासाठी एक मार्ग दाखवू शकलो. अशी भावना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. के. के अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.