मुंबई : कोरोना व्हॅसीनचा पहिला डोस घेतल्यानंतरही 21 हजारपेक्षा जास्त लोकांना व्हायरसची लागण झाली. तर दुसरा डोस घेतल्यानंतरही 5 हजार 500 हून अधिक लोकांना संसर्ग झाला. केंद्र सरकारने बुधवारी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICMRचे महासंचालक बलाराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 17,37,178 व्यक्तींनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला होता. त्यापैकी 0.04 टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचवेळी, कोविशिल्डचा दुसरा डोस घेत असलेल्या 1,57,32,754 लोकांपैकी 0.057 टक्के लोकांना विषाणूची लागण झाली आहे.


ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणजे काय?


भार्गव म्हणाले की, कोरोना लसीमुळे संसर्गाची जोखीम कमी होते त्यामुळे मृत्यू आणि गंभीर संक्रमण टाळले जाऊ शकते. ते म्हणाले की, लसीकरणानंतरही एखाद्याला संसर्ग झाल्यास त्याला ब्रेथथ्रू इन्फेक्शन (Breakthrough infection) असे म्हणतात.


भार्गव म्हणाले की कोव्हॅक्सिनचे आतापर्यंत 1.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यांपैकी 93 लाख लोकांना पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 4,208 लोकं म्हणजेच 0.04 टक्के लोकं संक्रमित झाले आहेत, जे प्रति 10,000 च्या लोकसंख्येमध्ये चार आहे.


ते म्हणाले की, सुमारे 17,37,178 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे आणि त्यापैकी केवळ 695 (0.04 टक्के) लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.