तुम्हीही लस मिळवण्यासाठी धडपड करताय का? या तरुणाचा जुगाड एकदा नक्की पाहाच
सेटिंगचं उत्तम उदाहरण, पाठून आला, रांग न लावता लस टोचवून गेला, बघा हा व्हीडिओ....
नवी दिल्ली: एकतर लसीकरण केंद्रबाहेर भलीमोठी रंग तरी असते किंवा लस तरी उपलब्ध नसते. अशा एक न अनेक समस्या सध्या भेडसावत आहेत. कधी लसीकरण केंद्र बंद तर कधी रात्रीपासून लोकांची लसीकरण केंद्राबाहेर गर्दी त्यामुळे लस मिळवायची तरी कशी असा अनेकांसमोर प्रश्न पडला आहे. हाच प्रश्न एक तरुणानी जुगाड करून चुटकीसरशी सोडवला आहे. त्याच्या या जुगाडाची दाद द्यावी की कारवाई करावी हा प्रश्नच पडला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. यामध्ये लस घेण्यासाठी चक्क तरुणानं लस मिळवण्यासाठी जुगाड केला आहे. या लसीकरण केंद्राबाहेर भलीमोठी नागरिकांची रांग लागली आहे. ही रांग पाहून तरुणाला लस मिळणार नाही हे समजतं. मग लस मिळवण्यासाठी तो मागे खिडकीपाशी जाऊन जुगाड करतो आणि त्याला एका मिनिटांत लस मिळते.
लालू प्रसाद यादव यांच्या मुलाने म्हणजेच तेजप्रताप यादव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही युझर्सनी त्यांच्यावर असा व्हिडीओ टाकल्याने टीकाही केली. त्यांनी कोरोनाची लस घेणं आता अगदी सोपं असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. 20 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.