Corona Vaccine : तीन कोटी लस कुप्या साठवण्याची तयारी
केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी सविस्तर अहवाल
मुंबई : नव्या वर्षात लसीकरण सुरू असल्याचे संकेत मिळाल्याने लस साठवणूक क्षमता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सध्या राज्यात तीन कोटी लस कुप्या साठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आलीय. राज्य सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी सविस्तर अहवाल दिलाय. त्यात ही आकडेवारी उघड झालीय.
राज्यात सध्या पाचहून अधिक लसींवर काम सुरू आहे. त्यापैकी भारत बायोटेक, सीरम यांनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. तर फायझरची लस तयार आहे. प्रत्येक लसीच्या साठवणुकीचं तापमान वेगवेगळे असेल.
सध्या २ ते ८ अंश सेल्सिअ तापमानात लस ठेवण्याची क्षमता हे. याशिवाय दोन नव्या वॉकइन कुलरच्या मदतीने १५ ते २५ अंश तापमानात लस ठेवण्याची क्षमता आहे. केंद्राकडून कोल्ड साखळी सुविधांच्या मूल्यांकनासंदर्भात महाराष्ट्र सुविधांच्या बाबतीत अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा राज्यात आहेत.
देशभरात कोरोनाचे (Covid 19) प्रमाण कमी होत असताना कोरोना बहुप्रतिक्षित कोरोना वॅक्सिनच्या (Corona Vaccine) वितरणाची तयारी वेग धरु लागलीय. वर्षभर कोरोनासोबत लढाई सुरु असताना आता लवकरच कोरोना वॅक्सिन जनतेपर्यंत पोहोचणार आहे. अशात आरोग्य मंत्रालयाने वॅक्सिन पोहोचवण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत.
सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना हे वॅक्सिन दिले जाणार आहे. प्रत्येक बूथवर शंभर जणांना वॅक्सिन दिले जाईल. गाईडलाईन्समध्ये यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार प्राथमिकता ठरवण्यात आलीय.
भारतामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा ९८ लाख ५७ हजार २९ झालाय. यामधील ९३ लाख ५७ हजार ४६४ जण उपचारानंतर ठीक झाले आहेत. तर ३ लाख ५६ हजार ५४६ जण अजूनही एक्टीव्ह रुग्ण आहेत.
देशामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ४३ हजार १९ जणांचा मृत्यू झालाय. देशामध्ये कोरोना रिकव्हरी रेट ९५ टक्के तर मृत्यूदर १.४५ टक्के आहे. देशात एक्टीव्ह रुग्णांचा दर ४ टक्के आहे.