कोरोना लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय....
देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात लसीकरण सुरू आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस साधारणपणे 28 दिवसांनी दिला जातो. मात्र आता हाच दुसरा डोस 6-8 आठवड्यांनी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांनी देण्याच्या सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेषतः कोव्हिशिल्ड या स्वदेशी लसीबाबत हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिलीय.