Coronavirus cases in India and World : चीनमध्ये(China) पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अशातच भारताचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला आहे. गुजरातमध्ये(Gujrat) सापडलेल्या रुग्णाने भारताचे टेन्शन वाढवले आहे. गुजरातमधील वडोदरा येथे कोरोनाच्या BF.7(bf.7 covid) प्रकाराचे प्रकरण समोर आले आहे. 61 वर्षीय यूएस महिलेमध्ये BF.7 प्रकार आढळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.


पुन्हा एअरपोर्टवर चेकींग होणार


दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता विमानतळावर परदेशातून येणा-यांची तपासणी केली जाणार आहे. एअरपोर्टसवर तपासणीशिवाय प्रशावाशांना सोडले जाणार नाही. चीनसह विविध देशांतून येणा-या नागरिकांसाठी सरकार लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहे. सध्या देशात कोरोनाचे 10 व्हेरियंटस असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर


चीन जपान अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज एक हायव्होल्टेज मिटींग घेतली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने अलर्ट नोटीस जारी केली आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा असं मांडवीय यांनी म्हटलंय. 


शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस


देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस जारी करण्यात आलीय. या शिवाय देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.


चीनमधली कोरोना रुग्णांमधली वाढ चिंताजनक; अदर पूनावाला यांचे ट्विट


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर कोरोना लस बनवणा-या सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावालांनी भाष्य केलंय. चीनमधली कोरोना रुग्णांमधली वाढ चिंताजनक आहे. पण भारतात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. कोरोनासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा असं ट्विट त्यांनी केलंय. भारतात राबवली गेलेली लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरु नका असं आवाहन अदर पूनावालांनी केले.