Corona : दिल्लीत कोरोनाचा कहर, लॉकडाऊन पुन्हा वाढवला
दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग दिल्लीत गंभीर रुप धारण करत आहे. ऑक्सिजनचे संकट आणि औषधांचा तुटवडा यांच्या दरम्यान ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविला आहे. सामान्यत: प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहेत तर नातेवाईक औषधांच्या शोधात सैरभैर झाले आहेत. या सर्वांच्या दरम्यान दिल्ली सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरमुळे 20 एप्रिलपासून सुरू असलेला लॉकडाऊन 10 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. आता 10 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू राहिल. 26 एप्रिलपासून सात दिवसांसाठी हा लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. पण आता लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे.
दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिका-याने आधीच अशी भीती व्यक्त केली होती की, दिल्लीची परिस्थिती पाहता ते किमान 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जावू शकतो. भविष्यात आवश्यक असल्यास तो 31 मे पर्यंतही वाढू शकतो. परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हाच एक पर्याय उपलब्ध आहे.
लॉकडाउन हे उरलेले एकमेव शस्त्र
आता लॉकडाऊन हेच लोकांचे प्राण वाचविण्याचे एकमेव शस्त्र आहे. लोकांना वाचवण्यासाठी सर्व काही केले जाईल. दिल्लीतील परिस्थिती सतत खराब होत आहे. कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग दर 36 ते 37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. संसर्ग दर अजूनही 30 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. ऑक्सिजनची कमतरता कायम आहे.
रुग्णालयांमध्ये गंभीर स्थिती
रुग्णालयात बेड आणि कोरोनाची औषधे उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनची कमतरता आहे. लोकं रूग्णालयात उपचार करण्यासाठी रात्रभर ठिकठिकाणी फिरत आहेत. प्रशासन असहाय्य दिसत आहे. येथे चिंतेचा मुद्दा असा आहे की दिल्लीत मृतांची संख्या सतत वाढत आहे. स्मशानभूमीत जाळण्यासाठी थांबावे लागत आहे. नवीन स्मशानभूमी बांधली जात आहेत. दफनभूमीच्या बाबतीत ही हिच स्थिती आहे.