coronavirus cases :  चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. (Coronavirus) कोरोनाचा कहर पाहता भारतात देखील त्याची दहशत पुन्हा दिसू लागली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. चीनमध्ये कोरोनामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली असताना एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) च्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या कालावधीत म्हणजेच 2021 मध्ये भारतात तब्बल 1 लाख 64 हजार नागरिकांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे मानसोपतार तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन वर्षात नैराश्याच्या प्रमाणात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागची दोन वर्षे ही कोरोनाच्या (Corona) सावटाखाली गेली. या काळात कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या भयंकर साथीच्या रोगामुळे लोकांनी फक्त जवळचे लोकच गमावले नाहीत, तर नोकरी (Job) आणि पैसाही (Money) गमावला. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना तर उपासमारीच वेळ आली. तर अनेकांनी हाताला काम नसल्याच्या आणि नोकरी गेल्याच्या तणावातून कोरोना काळात आत्महत्या (Suicide) केल्या. या दोन वर्षांतील आत्महत्यांची आकडेवारी ही मागच्या जवळपास 55 वर्षांनंतर सर्वाधिक आहे. याचदरम्यान नाशिक (nashik corona) जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यात 345 लोकांनी आपले जीवन संपवले. तर NCRB च्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारतात सुमारे 1 लाख 64 हजार लोकांना आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


यामध्ये आर्थिक ताणतणाव, आजार, कौटुंबिक वाद ही काही यामागील कारणे आहेत. तर मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मागच्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण हे 25 टक्क्यांनी वाढले असून यामध्ये 15 ते 30 वयोगटातील मुला मुलींची संख्या आत्महत्या करण्यात अधिक आहे. कोरोना काळात ताणतणाव वाढला, आजारपणावर पैसे मोठ्या प्रमाणावर खर्च झाले, आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आणि यामुळे नागरिकांमध्ये नैराश्य वाढले. आत्महत्या करण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरले आहे. 


 वाचा: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा! 


दरम्यान देशात 1967 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दर 10 लाख लोकसंख्येमागे 120 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हा दर 2020 च्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी जास्त आहे. यापूर्वी 2010 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती. तेव्हा दर 10 लाख लोकांमागे 113 जणांनी आत्महत्या केल्या होत्या.