नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क घालण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशात 17 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आतापर्यंत 14 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 17 हजार नव्या रुग्णांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाने अलर्ट दिला आहे. 


देशात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण केरळ राज्यात आहेत. केरळमध्ये 4083 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात 3640 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


तमिळनाडूमध्ये 2069 तर पश्चिम बंगालमध्ये 1524 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.