नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या वेव्हचा (Coronavirus 2nd Wave) वेग कमी होत असल्याचे दिसून येतोय. नवीन केसेस कमी झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु असे असूनही, कोरोनाची (Covid-19 Pandemic) दुसरी लाट संपण्यास वेळ लागणार असे एक्सपर्ट म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे केसेस भारतात कमी होत असल्या तरी दुसरी लाट पूर्णपण जाण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार असून हे जुलैपर्यंत सुरु राहील असे संसर्गजन्य रोगांचे तज्ञ आणि व्हायरॉलॉजिस्ट शाहिद जमील सांगतात. एका ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना शाहिद जमील बोलत होते. 


'कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या लाटेतील संक्रमित होणार्यांची संख्या कमी होत असली तरी यावर सध्या पूर्णपणे नियंत्रण आणणे सोपे नसल्याचे ते म्हणाले. यासाठी अजून खूप वेळ लागणार आहे. पण येणाऱ्या दिवसात दर दिवसाला वाढणाऱ्या संख्येचा सामना करावा लागणार असल्याचे जमील म्हणाले.



पहिल्या लाटेतील संक्रमितांच्या संख्येतील घट आपण पाहीली. पण यानंतर संसर्ग झालेल्या लोकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत जास्त आहे. पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची संख्या 96000-97000 हजार होती. तर यावेळी ही संख्या 4 लाखाहून अधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या बरीच जास्त आहे. त्यामुळे यास अधिक वेळ लागेल असे जमील म्हणाले. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत भारतात कोरोनांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 9 मे रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत देशभरात 4 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. 10 मे रोजी देशभरात 3.66 लाख, 11 मे रोजी 3.29 लाख आणि 12 मे रोजी 3.48 लाख नवीन केसेसची नोंद झाली.