नवी दिल्ली : Coronavirus in India : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही वाढत आहे. यापुढे कोणताही धोका नको म्हणून केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार 50 टक्के कर्मचारी कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Corona virus - Call 50 percent of employees to work, new guidelines from the central government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका. सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी. उर्वरित कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.



तसेच दिव्यांग, अपंग कर्मचारी यांना कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गरोद महिलांना सूट देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईत 20 टक्के रहिवासी बाधित आढळल्यास इमारत सील करण्यात याव्यात. तसेच इमारतीतील एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल, असे आदेश मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.