नवी दिल्ली : देशात कोरोनाव्हायरसची (coronavirus)  लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. तसेच १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढून १,०१. १४१ झाले आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ३४९३ नवीन प्रकरणे नोंदली गेली. एकट्या मुंबईतच १३७२ नवीन प्रकरणांची नोंद झाली. शुक्रवारी,१७१८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४७,७९३ लोक या बरे झाले आहेत.  आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४७ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.


शुक्रवारी प्रथमच देशात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून १०,०००हून अधिक संसर्ग होण्याची प्रकरणे नोंदली गेली. कोविड -१९ बाबत विशेष लक्ष द्यावे आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यांना सांगितले.


कोरोना विषाणूचा परिणाम लक्षात घेता लागू असलेल्या लॉकडाऊनमधून हळूहळू देशातून उठविण्याबाबत येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असताना ही बैठक होणार आहे. कोविड -१९   'अनलॉक -१' दरम्यान लॉकडाऊनने बाधित झालेल्या आर्थिक कामांना गती देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती सर्वसामान्य लोकांना आणि व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान १६ आणि १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील.


' worldometers 'नुसार गुरुवारी कोरोना विषाणूच्या बाबतीत भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. भारतात कोरोना विषाणूची पहिली घटना ३०जानेवारी रोजी नोंदली गेली आणि त्यानंतर संक्रमित संख्येत एक लाख पोहोचण्यासाठी १०० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला, परंतु २ जूनपर्यंत हा आकडा दोन लाखांवर पोहोचला. गेल्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये झालेल्या संसर्गापासून जगभरात ७.५ दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, त्यापैकी चार लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.