नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवगणिक वाढत असल्याचं लक्षात घेता लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. पुढील २१  दिवसांपर्यंत देशभरात ही लॉकडाऊनची परिस्थिती कायम असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांनी ही अतिशय महत्त्वाची बाब जाहीर करताच नागरिकांनी तातडीने किराणा मालाची दुकानं आणि भाजी मंडई गाठत त्या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात अन्नधान्य आणि जीववनावश्यक वस्तूंच्या सेवांचा साठा सुरुच ठेवणार असल्याचं जाहीर केलं असलं तरीही नागरिकांनी मात्र गर्दी करणं सुरुच ठेवलं यावरच तोडगा म्हणून आता प्रशासनाने एक उपाय शोधला आहे. 


दिल्लीतील केजरीवाल सरकारने काढलेल्या या तोडग्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी दिल्लीतील दुकान मालक आणि भाजीपाल्याची विक्री करणाऱ्यांना ई- पास देण्याची घोषणा केली आहे. शिवाय जनतेने घरातच थांबावं, या परिस्थितीला घाबरुन जाऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


'मी जनतेला पुन्हा सांगतो की, भीतीपोटी सामान खरेदी करु नका. अत्यावश्यक सामानाचा तुटवडा होणार नाही. अत्यावश्यक सामानाची विक्री करणाऱ्यांना ई- पास देण्यात येणार आहे. तेव्हा आता जे कोणी आपली दुकानं उघडतील त्यांना ई पास दिला जाणार आहे', असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 



 


दिल्लीमध्येही कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं मोठं आवाहन आहे.