हमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात
एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात ....
नवी दिल्ली : आर्थिक क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला असणारं एकंदर वातावरण पाहता, भारत सरकारकडून लघू मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांच्या व्याजदरात ८.६ टक्क्यांवरुन ७.४ टक्के इतकी कपात करण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर ७.९ वरुन थेट ६.८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
पीपीएफ अर्थात पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा व्याजदर ७.९ वरुन आता ७.१पर्यंत आणण्यात आला आहे. ७.६ टक्के (११३ महिन्यांची मॅच्युरिटी) व्याजदर असणारी किसान विकास पत्र योजना आता (१२४ महिन्यांची मॅच्युरिटी) ६.९ व्याजदरात उपलब्ध असेल. सुकन्या समृद्धी योजनेत ८.४ टक्क्यांवरुन व्याजदरात ७.६ टक्के इतकी कपात करण्यात आली आहे.
तसेच एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात ६.९ टक्क्यांवरुन ५.५ टक्के इतकी कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार ही जवळपास १.४ टक्के इतकी कपात आहे.